Thursday, May 13, 2010

हे असे का? ते तसे का?

सळ-सळला पिंपल झुलुक आली हलकी---कोवली उन्हें का दाखवतात सलगी हळूच का हसले फूल मला पाहुन का गेला वेड़ा राघू शीळ घालून मुके मुके हुंदके --ख़ल-खलुन हसने बेभान होऊं न गाताना उन्मुक्त नाचने असे का हे? तसे का ते? असे कसे बाई रोजचेच जग का नवे वाटते बाई लहान नाहीस ताई आता मोठी झालीस बाई डोळ्यातले पाणी पुसत हसून म्हणते आई

Saturday, April 24, 2010

continue

शब्द आहे श्वास ज्याचा ते प्रिया तू गीत दे

तो मला तू सूर दे

श्वास हा शृंगार ज्याचा तो मला तू सूर दे -शब्द आहे श्वास ज्याचा ते प्रिय तू गीत दे
सागराचा ताल अन दे सृष्टिचीलय्बधता शब्द येवो भाव लेउनी आत्मीयता अन दिव्यता --नाद मी अन ब्रम्ह हीहे वेड मजला लागु दे
शब्द आहे श्वास ज्याचा ते प्रिया तू गीत दे
जा-उदे सखया विझोनी ही रिपुंची तप्त-ता
अंगीचे अंग्त्व विरुनी फ़क्त उरुदे आर्तता
मीच इश्वर अन भक्त ही मी हे एक्य मजसी लाभु दे
शब्द आहे श्वास ज्याचा ते प्रिया तू गीत दे
अमृताचा स्वर दिला मज अन सूरांची भव्यता
सधानेतुंन प्राप्त होवो उन्मनिची शांतता
जे गुरुनी मज दिले ते निर्मिकला अर्पु दे

तो मला तू सूर दे

kshamasva

नसतोस घरी हे विंडबन संदीप खरे ह्यांची क्षमा मागुन लिहित आहे

नसतोस घरी तू जेव्हा

नसतोस घरी तू जेव्हा मी झेंडा-वंदन करते मुक्तीची गाते गीते अन श्वास मोकला घेते
त्या सकालच्या गर्दित तो व्याप चहाचा नाहि थकलेल्या संध्याकाळी घुतक्याचा तापही नाहि
नसतोस घरी तू जेव्हा
मी ब्रेअड मागवून घेते कधी सकालच्या भाताला मी मस्त फोडनी देते
नसतोस घरी तू जेव्हा
मी वाचत लोळत पड़ते त्यानेही दमते तेव्हा मी मस्त झोपुनी जाते
नसतोस घरी तू जेव्हा
ती बैठक केविलवाणी मित्रांचा राबता नास्ता मी मीच घराची rani